वडापुरी माळवाडी गटात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवारांचे दौरे, भेटीगाठी, बैठका आणि प्रचार सभांनी गावागावात चांगलाच जोर धरला आहे. या गटात सतिश (गोटू ) पांढरे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवत जंजावाती प्रचाराची सुरुवात केली असून त्यांच्या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गावोगावी फिरत सतीश पांढरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.

सतिश (गोटू) पांढरे यांनी प्रचारा दरम्यान ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीज प्रश्न, आरोग्य सुविधा, तरुणांना रोजगार आणि महिलांच्या समस्या या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे. गावाच्या विकासासाठी फक्त आश्वासन नको असे सांगत त्यांनी आतापर्यंत झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला.त्यामुळे वडापुरी माळवाडी गटातील अनेक गावांत त्यांच्या प्रचार फेरीला ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे आयात उमेदवार, कधीही लोकांनी न पाहिलेला तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाही चालवन्यासाठी आप्पासाहेब जगदाळे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशराज आप्पासाहेब जगदाळे यांच्या बाबत ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. पंचायत समिती सदस्य असताना सतिश पांढरे यांनी घरकुले, बंदिस्त गटारी, शेतकऱ्यांना गायगोठे, विहिरी मंजूर करणे, तसेच गोरगरीब लोकांच्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पंचायत समिती मध्ये काम करणारा पाहिला पंचायत समिती सदस्य म्हणून सतिश ( गोटू) पांढरे यांची ओळख असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जगदाळे यांच्या प्रचार दौऱ्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या गावागावात चर्चा रंगू लागल्या असून अनेक ठिकाणी यावेळी जनतेने हे मतदान हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे.

सतिश पांढरे यांचा थेट ग्रामीण भाषेतील संवाद मतदारांच्या मनाला भावत असून त्यांनी या गटात केलेले सामाजिक काम फार मोठे व्यापक आहे. वडापुरी माळवाडी या गटात सतिश पांढरे यांनी जातपात न पाहता समाजात मिळून मिसळून काम केल्याचे दिसून येतं आहे. केलेल्या कामामुळे पांढरे यांना वयक्तिक मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे त्यांच्या प्रचाराला दिवसें दिवस ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वडापुरी माळवाडी गटातील लढत चांगलीच रंगतदार होत आहे. एकीकडे पांढरे यांचा जंजावाती प्रचार आणि दुसरीकडे राष्ट्रवादी उमेदवार यांच्या विरोधात वाढत चाललेली नाराजी यामुळे या गटातील निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार ? हे येत्या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.